लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : तब्बल दीडशे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून बावीस लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी ( रा. थेऊर रस्ता लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नाव आहे. हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर यापूर्वी दीडशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल असून तो मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याने अलीकडे गुन्ह्याची पद्धत बदलली होती तो दिवसा घरफोड्या करत असल्याची माहिती मिळाली होती. तो थेऊर येथे असल्याची माहिती मिळाली. कल्याणी याला सापळा लावून पाकडले.

आणखी वाचा-चिंचवडमध्ये धावत्या मोटारीने घेतला पेट अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, अमोल हिरवे, विकास मरगळे, राहुल वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.