पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. कुणाल कुमार हे १९९९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे आयुक्तपद रिक्त होते.
पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन बदली केली. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2014 रोजी प्रकाशित
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाल कुमार
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.

First published on: 19-08-2014 at 05:57 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunal kumar will be new commissioner of pune municipal corporation