लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक राहीले आहेत.
     
मार्च महिन्यात म्हाडा पुणे मंडळाने सोडत जाहीर केली. ८ मार्चपासून या सोडतीमधील घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे अर्ज करण्यासाठी ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविण्यात आली.

आणखी वाचा-“गरिबांचा एक अन् श्रीमंतांचा एक असे दोन…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका पुढीलप्रमाणे

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना – १८
  • म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
  • पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
  • २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६
    एकूण ४८७७ सदनिका