दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. यामुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं इतर पक्ष देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवणार का? की निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागताच पिंपळे गुरव येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संपर्क कार्यालयावर गर्दी झाली होती. 

हेही वाचा- काश्मिरी महिलांच्या बेकरी व्यवसायाला पुणेकरांच्या मार्गदर्शनाची जोड

Sangli Lok Sabha, Chandrahar Patil,
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा
bhiwandi lok sabha marathi news
भिवंडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काँग्रेसशी अजूनही सूर जुळेना
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
Eknath Khadse
एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? राजकीय पुनर्वसनासाठी घरवापसीची शक्यता!

केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे अस बोलले जात आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसती तरी शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी शंकर जगताप यांचा फोटो भावी आमदार म्हणून व्हाट्स स्टेट्स ठेवण्यास सुरुवात केली असून रिल्स देखील बनवण्यात आले आहेत. हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकेकाळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निटवर्तीय मानले जायचे. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात राष्ट्रवादीची वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळू शकते. 

सर्व पक्षीय नेत्यांनी घेतली होती जगताप कुटुंबीयांची भेट

भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुर्धर आजराने निधन झाले आहे. या घटनेमुळे भाजप आणि पिंपरी- चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.