आपल्या अनुभव विश्वाच्या आधाराने तयार झालेले आपले म्हणणे मांडण्याच्या तळमळीला शैलीची जोड मिळाली आणि राजकीय, सामाजिक घटनांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन सोमवारी उलगडला. विचारांच्या या जागराचे निमित्त होते ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेचे.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी सोमवारी झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बीबीए विभागाच्या प्रमुख डॉ. तनुजा देवी उपस्थित होत्या.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला, त्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली होती. पुण्याबरोबरच मिरज, बारामती, जुन्नर, अकलूज या ठिकाणाहून देखील स्पर्धक आले होते. पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीतील ७२ स्पर्धकांमधून १४ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. सध्याच्या राजकीय, सामाजिक विषयांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन, भूतकाळातील घटनांचे त्यांनी लावलेले अन्वयार्थ आणि परिस्थितीची चिकित्सा करण्याची क्षमता असे तरुणाईचे पैलू या स्पर्धेच्या निमित्ताने उलगडत गेले. स्पर्धकांचा उत्साह, दाद द्यावी अशी खिलाडू वृत्ती यांमुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. निकाल जाहीर होण्यापूर्वी या आधीच्या स्पर्धाच्या चर्चा, कोणाचा कोणता मुद्दा आवडला, काय खटकले अशा चर्चा स्पर्धकांमध्ये रंगल्या होत्या.
‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑईल’, इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून ‘युनिक अॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. या फेरीसाठी  डॉ. केतकी मोडक, प्रा. विश्राम ढोले, प्रा. जयंत जोर्वेकर, वर्षां गजेंद्रगडकर यांनी परीक्षण केले. परीक्षकांनी केलेल्या चिकित्सेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अधिकच रंग भरला. स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी १ फेब्रुवारीला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागीय अंतिम फेरीत निवड झालेले स्पर्धक
अमूल्या भाटवडेकर (संजय भोकरे इन्स्टिटय़ूट, मिरज)
वैशाली कुंभार (विद्या प्रतिष्ठान, बारामती)
बालाजी तळेगावे (मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर)
मयूर आव्हाड (फग्र्युसन महाविद्यालय)
चित्ततोष खांडेकर (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, संस्कृत विभाग)
आकाश जगताप (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
अर्जुन नलावडे (संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
निखिल कुलकर्णी (संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
माधुरी निंबाळकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणित विभाग)
अभिषेक घैसास (स.प. महाविद्यालय)
संस्कृती गाडेकर (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
शुभम श्रोत्री (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
आकाश दराडे (पीईएस मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय)
तन्मय देशमुख (ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vakta dashasahasreshu elocution competition
First published on: 19-01-2016 at 03:20 IST