लोणवळ्यात युवक आणि युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लोणवळ्यातील भुशी धरणाजवळ त्यांचे मृतदेह आढळले आहेत. सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोघा विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या या हत्येनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे दोघेही विद्यार्थी सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दोघे जण रविवारपासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जाऊ लागला होता. सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास एक व्यक्ती त्या ठिकाणाहून जात असताना त्याला दोघांचे मृतदेह आढळले. या प्रकाराची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दोघांच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत.  मुलीचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना त्वरित अटक करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तपास मोहीमेला सुरुवात

या हत्येची माहिती मिळताच पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहे. पोलिसांकडून लोणावळा भागातील सराईत चोरट्यांची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. संशयित मारेकऱ्यांचा शोध घेण्यास विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  महाविद्यालयीन तरुण, तरुणीचे खून झाल्याचे उघडकीस येताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे मंगळवारी लोणावळ्यात आले. त्यांनी तातडीने लोणावळा भागातील सराईत चोरट्यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

मित्र मैत्रिणींकडे चौकशीला

या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. सार्थक आणि श्रुती यांनी मोबाइलवरुन साधलेला संपर्क त्यांच्या फेसबुक खात्यांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lonavala double murder case singhgad college students killed in lonavala
First published on: 04-04-2017 at 21:03 IST