जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ७२ गावांमधील पशूंना लंपी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटचा परिसर बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले आहेत. प्राण्यांमधील संक्रमण आणि सासंर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नियम १२ नुसार जिल्ह्यातील लंपी रोगाची बाधा झालेल्या आणि न झालेल्या पशूंना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून दहा कि.मीचा परिसर बाधित क्षेत्र पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी, शिक्रापूर, पाबळ, करडे, मांडवगण, खैरेवाडी, करंदी, केंदूर, धामारी, मुखई आणि डिग्रजवाडी. आंबेगावमधील शिगवे (गोराडे मळा), चिखली, तेरुगाव, नानवडे आणि पिंपळगाव. हवेलीतील आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, शिंदवणे, वळती, सांगवी-सांडस, पिंपरी सांडस, देऊगाव, कोंढवा, किर्तनेबा मुंढवा आणि आभाळवाडी-वाघोली. जुन्नरमधील भोरवाडी (येडगाव), बोरवाडी, मुथाळणे, जांभूळशी, आंबेगव्हाण आणि गायमुखवाडी. खेडमधील पाईट, धानोरी, रोहकल, चारोळी, चऱ्होली, वाळद, किवळे आणि भोसे. इंदापुरातील डाळज क्र. २०, कुंभारगाव, भोडानी, लासुर्णे, बेलवाडी, उद्धट, कळंब, रुई, भिगवण आणि बिजवडी.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची – पेशवे दरबारातील इंग्रजांच्या वकिलाचा ‘संगमावरचा बंगला’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दौंडमधील धुमाळीचा मळा, दापोडी, डोंबेवाडी, भांडगाव, देलवडी आणि पाटस, बारामतीमधील कोऱ्हाळे, लोणी भापकर, काटेवाडी, पारवडी, साबळेवाडी, उंडवडी-कप, करंजेपूल, डेबेवाडी आणि सांगवी. पुरंदरमधील इनामके मळा सासवड. भोरमधील जयतपाड, बसरापूर आणि हरिश्चन्द्री. मुळशीतील भुकूम आणि मावळातील टाकवे आणि वारू अशा ७२ गावांमधील पशूंना लंपीची लागण झाली असल्याचे आदेशात म्हटले आहे.