पिंपरी : चिंचवड येथील एका सौंदर्य प्रसाधन विक्रेत्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये एका सौंदर्य प्रसाधनावर ‘मेड इन पाकिस्तान’ असे नमूद होते. विक्रेत्याने साठा कोठून प्राप्त केला याचा पोलीस आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तपास करीत आहेत.
विक्रेत्यावर न्यायालयात खटला दाखल केल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले. चिंचवड येथे जप्त करण्यात आलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा पाकिस्तानातील लाहोर येथून आयात करण्यात आला आहे का, संबंधित उत्पादक कंपनीकडे आयात-निर्यात परवाना नसतानाही साठा शहरात आणला का, धायरी परिसरात सापडलेल्या २० लाख ७२ हजार रुपयांच्या सौंदर्य प्रसाधन साठ्यावर कारवाई करण्यात आली.
हा साठा कर्नाटक, तेलंगणा राज्यातून आलेला असून, अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती, हे खरे आहे का, पिंपरी-चिंचवड आणि धायरी परिसरातील जप्त केलेल्या साठ्यासंदर्भात दोषींवर काय कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार भीमराव तापकीर, मनीषा चौधरी यांनी विचारला होता. त्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी लेखी उत्तर दिले आहे.