साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराला परंपरेनुसार मानाच्या शिखरी काठ्या भेटल्या आणि माघी पौर्णिमा यात्रेत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण आणि ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’ असा जयघोष केला.

हेही वाचा- इंदापूरमधील ब्रिटिशकालीन डिकसळ पूल बंद; भिगवण बाजारावर परिणाम

परंपरेनुसार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मानाच्या शिखरी काठ्या मिरवणुकीने खंडोबा गडावर नेल्या जातात. संगमनेरची होलम राजा व सुपे (बारामती) येथील खैरे आणि जेजुरीतील होळकर यांच्या मानाच्या काठ्या खंडोबा गडावर नेण्यात आल्या. विविधरंगी कापडांच्या आकर्षक छटा असलेल्या मानाच्या काठ्या भक्तांनी आनंदाने नाचविल्या. शिखरी काठ्यांबरोबर आलेल्या मानकऱ्यांचा सत्कार खंडोबा देवस्थानतर्फे करण्यात आला. यात्रेमध्ये भंडार-खोबरे,देवाचे टाक,मूर्ती दिवटी-बुधली,प्लॅस्टिक खेळणी यांना मोठी मागणी होती.

हेही वाचा- पुणे : फिरोदिया करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरु; प्राथमिक फेरीसाठी ३० संघांची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळी बांधव मुक्कामी आल्यामुळे जेजुरीमध्ये सर्वत्र गजबजाट होता. तात्पुरते कापडी मंडप उभारून चांदीच्या पालख्या उतरवण्यात आल्या होत्या. संगीताच्या तालावर कोळी बांधवांनी नृत्याचा आनंद लुटला. कुलधर्म कुलाचार करून माघी यात्रेचा आनंद लुटून कोळी बांधवांनी खंडेरायाचा निरोप घेतला.