“पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४टक्के पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये होत आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे. तर, “पुण्यात निर्बंध शिथिल करायचे असतील तर प्रस्ताव पाठवा, असं आरोग्यमंत्री म्हणाले. मग प्रश्न हा पडतोय, असा प्रस्ताव मुंबईने आणि शिथीलता दिलेल्या इतर जिल्ह्यांनी दिला होता का?” असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविकासआघाडी सरकारला सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम

महापौर म्हणाले, “ऐकावे ते नवलच आहे. मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना त्यांच्याकडून कोणते प्रस्ताव दिले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची? अशी प्रक्रिया कधी सुरू झाली? आम्ही पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मागणी करत आलो आहे. पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात, मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच असते. पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामन्यांना न्याय हवा आहे. महाविकास आघाडीने अंतर्गत वाद मिटवावेत आणि पुणेकरांना न्याय द्यावा!”

करोना र्निबधांनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले, तरीही पुणे शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम आहेत. त्यामुळे दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवून व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवून दिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय होण्याची प्रतीक्षा असून सोमवापर्यंत (९ ऑगस्ट) दुकाने चारनंतर उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. तर, या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

तसेच, “पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामन्यांना निर्बंध शिथिलतेच्या बाबतीत न्याय हवा आहे. याच अनुषंगाने पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिथिलतेसाठी प्रस्ताव देण्यास सांगितले असून याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.” असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

याचबरोबर “खरं तर मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना त्यांच्याकडून कोणते प्रस्ताव दिले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची? अशी प्रक्रिया कधी सुरू झाली? पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मागणी करत आलो आहे. पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात, मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच असते. मात्र तरीही या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहोत, असा शब्द व्यापारी प्रतिनिधींना दिला.” असं देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे.

Lockdown Relaxation : …तर मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?; पुण्याच्या महापौरांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी या अगोदर ट्विटरवरुन विचारलाय. मोहोळ यांनी या नव्या आदेशांमध्ये पुण्यातील निर्बंध कायम ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे,” असं मोहोळ यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi should resolve internal disputes and give justice to the people of pune murlidhar mohol msr 87 svk
First published on: 06-08-2021 at 07:35 IST