महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुकोबाराय हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार अखंडितपणे अंमलात राहतील, यात शंका नाही असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत. ते आज (बुधवार) देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. 

PHOTOS : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहूत ; शिळामंदिराचे घेतले दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जगद्गगुरु संत तुकोबारायांचं दर्शन घेतलं. पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहूत आले आहेत. तुकोबांच्या मुख्य मंदिरात भगतसिंह कोश्यारी यांचं टाळ,मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.

“कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे…”; अमोल कोल्हेंचं राज्यपाल कोश्यारींसमोर विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिळा मंदिरात जाऊन घेतलं दर्शन –

यावेळी राज्यपालांनी स्वत: गळ्यात टाळ घेऊन भजन केलं. वारकऱ्यांसह टाळ आणि मृदंगाच्या गजरात राज्यपाल तुकोबांच्या नामघोषात तल्लीन झाले होते. त्यांनतर, त्यांनी शिळा मंदिरात जाऊन तुकोबांच दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच शिळा मंदिराच लोकार्पण सोहळा पार पडला होता.