scorecardresearch

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ घेतली जाणार आहे.

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ घेतली जाणार आहे. २१ ऑगस्टला राज्यभरातील ३७ केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२साठीची जाहिरात बुधवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार वित्त आणि लेखा सेवा गट अ सहायक संचालक, नगरपालिका, नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त गट ब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आदी पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येईल. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे २१ ते २३ जानेवारी किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासह आरक्षण, पात्रता, भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे या संदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये राज्य शासनाच्या विभागांच्या सुचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त किंवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे नमूद करण्यात आले आहे.

http://mpsc.gov.in/downloadFile/english/4913

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra public service commission mpsc 2022 pre service examination post exam state centers amy

ताज्या बातम्या