पुणे : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, दत्तप्रसाद दाभोलकर आणि मंगला सामंत यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अभिराम भडकमकर, मोनिका गजेंद्रगडकर, भानू काळे, दिलीप फलटणकर, खलील मोमीन, श्रीराम कुंटे, मुग्धा गोडबोले, माधव जाधव, नितीन हांडे, सदानंद कदम, मेघना भुस्कुटे, भीमराव वाघचौरे, डॉ. सविता नायक-मोहिते, शैला मुकुंद, विवेक गाडगीळ, डॉ. लता अकलूजकर, विद्या डेंगळे, मोहन काळे, मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, संजीवनी खेर, कृष्णाजी कोकाटे, नीलकंठ कदम, डॉ. रेवा दुभाषी, डॉ. संजय कप्तान, डॉ. कुशल पाखले, डॉ. संजय तुंगार, सुधीर साबळे, मंदार गद्रे, विद्या पोळ-जगताप, संजय दुधाणे, महेंद्र कुरघोडे, विजया ब्राह्मणकर, श्रीधर दीक्षित या लेखकांच्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अजीम नवाज राही, प्रशांत असनारे, हेमकिरण पत्की, चं. प्र. देशपांडे, डॉ. अशोक चौसाळकर, शिवराज गोर्ले, डॉ. सुनीलकुमार लवटे, हेरंब कुलकर्णी, डाॅ. श्री. द. महाजन, रमणलाल शहा, डॉ. अरुणचंद्र पाठक, मधुवंती पेठे, व. बा. बोधे, अनघा केसकर, श्रीपाद ब्रह्मे, सु. ल. खुटवड, महेश कराडकर, विनया देसाई, उमेश घेवरीकर, उषा मेहता हे यंदाच्या विशेष ग्रंथकार पुरस्काराचे मानकरी आहेत.

एस. एम. जोशी सभागृह येथे २६ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.