Maharashtra Board Class 10 Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मुद्रित प्रत घेता येणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत १० दिवस लवकर घेतल्या. तसेच, निकालही १५ मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे दहावीच्या निकालाकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात यंदा घट झाल्यामुळे दहावीचा निकाल वाढणार की घटणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरवणी परीक्षा अर्ज १५ मेपासून

दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील. तसेच, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज १५ मेपासून भरून घेण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.