पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत, असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली, तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.