पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस ‘आयएसओ २७००१-२०१३’ हे मानांकन मिळाले आहे. बँकेने संगणक प्रणालीचे पायाभूत मजबुतीकरण केले असून, यासाठी हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक प्राप्त झाले आहे.

‘इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ स्टँडर्डायजेशन’ (आयएसओ) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मार्चमध्ये आयएसओ लेखापरीक्षण करून बॅंकेस हे प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र पुढील तीन वर्षे वैध असेल. या कालावधीत आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे बँकेचे नियमित परीक्षण होणार आहे. याबाबत बँकेने म्हटले आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या माहितीची सुरक्षा महत्त्वाची मानून बँकेने स्वत:च्या संगणक प्रणालीचे पायाभूत मजबुतीकरण केले आहे. याच व्यवस्थेच्या उत्कृष्ट उभारणीसाठी बँकेला आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रमाणपत्र मिळाले आहे.

हेही वाचा – पुणे : रेल्वेचा आता पंचतारांकित विश्रांतीकक्षाचा घाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या होत असलेले सायबर हल्ले पाहता भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेने स्वतंत्रपणे वाशी येथे ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’ उभारणीचे काम हाती घेतले आहे. याचा फायदा भविष्यात सर्व सहकारी बँकांना उपलब्ध करून देण्याचा बँकेचा मानस आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.