पुणे : अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल थंडावली आहे. त्यामुळे केरळमधील आगमन आणखी लांबणीवर पडले आहे. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून आहे. मात्र, पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अनुकूल वातावरण नसल्यामुळे मोसमी वाऱ्यांची अत्यंत संथ गतीने वाटचाल सुरू आहे. केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी सात केंद्रांच्या कार्यक्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. ढगांची दाटीही वाढत आहे. केरळमध्ये मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

Imd predicts heatwave again in mumbai chances of rain in other parts of maharashtra
मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही डॉ. कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

‘बिपोरजॉय’ची दिशा महत्त्वाची अरबी समुद्रात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ मुंबईपासून सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर समुद्रात तयार होईल. सध्याच्या स्थितीनुसार ते पश्चिम दिशेला झुकण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल केल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल. त्याचा फायदा मोसमी वाऱ्यांना होऊन मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभाग चक्रीवादळाच्या दिशेवर बारकाईने लक्ष  ठेवून आहे.