पुणे : राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्या सर्व शेतकर्याचे कर्ज माफ करण्यात यावे, केंद्र आणि राज्य सरकार मार्फत मदत करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. त्याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्यावर होते.त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून किती मदत मिळणे अपेक्षित आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले, आजवर प्रत्येक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मदत करत आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा देखील शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतील,असा विश्वास व्यक्त करीत ते पुढे म्हणाले, शेतकर्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारमार्फत कोणत्याही प्रकारचा हात आखडता घेणार नाही.
सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले,हे संकट मोठ असून शेतकर्यांना जेवढी मदत करता येईल, तेवढी कमीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मी आणि अनेक मंत्री शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख आणि नुकसान पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकर्याला नव्याने उभा करणे आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे ही प्राथमिकता आहे. शेतकर्यांच्या कर्ज माफीचा निर्णय सरकार नक्की घेणार अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.