सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि वाशिमच्या सिंकदर शेखने प्रतिस्पर्ध्यांना काही सेकंदातच अक्षरशः लोळवत ६५व्या महाराष्ट्र केसरी गटाच्या माती विभागातून अंतिम फेरी गाठली. मॅटवरून माजी विजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारा पुणे जिल्ह्याचा शिवराज राक्षे यांनी अंतिम लढत गाठली.कोथरुड परिसरात सुरु असलेल्या या स्पर्धेत गुणांवर निकाल लागलेल्या कुस्ती बघणाऱ्या कुस्ती शौकिनांना महेंद्र गायकवाड आणि सिंकदर शेख यांनी चितपट कुस्तीचा अनुभव दिला. महेंद्र गायकवाडने लढतीला सुरुवात होताच एक टांग डावार कोल्हापूरच्या शिवम शिदनाळेला खाली घेतले आणि त्याच स्थितीत खाली दाबून ठेवत चौदा सेकंदात शिवमला आस्मान दाखवले.

हेही वाचा >>>पुण्यात ‘स्टोन क्रशर’ चालकांकडून सर्वांत मोठी वीजचोरी; महिन्यात राज्यात ११ कोटीहून अधिकची वीजचोरी उघड

all the three parties in grand alliance fighting to take the lok sabha seat of nashik
भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
heat Caution warning of health department in the background of heat stroke mumbai
तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

सिकंदर शेख आणि बाला रफिक शेख यांची लढत विलक्षण वेगवान झाली. माजी विजेत्या बालाने पहिल्याच मिनिटाला एकेरी पटाचा डाव टाकत दोन गुणांची वसूली केली. मात्र, कमालीचा चपळ असलेल्या सिंकदरने पुढच्याच सेकंदाला पलट डाव करत बालाचा ताबा मिळवत दोन गुणांची बरोबरी साधली. तीच पकड घट्ट करत सिंकदरने बालाला भारंदाज डाव टाकून खाली दाबले. कुस्ती धोकादायक स्थितीत जाण्यापूर्वीच सिकंदरने तेथेच बालाची पाठ आखाड्याला टेकवत सनसनाटी विजयाची नोंद केली. तेव्हा लढतीची केवळ ५२ सेकंद झाली होती.

हेही वाचा >>>पुणे: मराठवाडा, विदर्भापेक्षा कोकणात वीजचोऱ्या जास्त; महिन्यातच ३.६८ कोटींची वीजचोरी उघडकीस

मॅटवरील लढतीत मात्र, फारशी चुरस दिसली नाही. वाढत्या थंडीमुळे पडणाऱ्या दवापासून पा घसरण्याची भिती होती. त्यामुळे मल्लांचा पवित्रा सावधच राहिला. अनुभवी आणि माजी विजेत्या हर्षवर्धनने आपल्यापेक्षा प्रचंड ताकदीच्या पुण्याच्या तुषार डुबेला रोखण्याचा अचूक प्रयत्न केला. लढत न केल्यामुळे पंचांनी दोन वेळा तुषार दुबेला इशारा दिला आणि या दोन्ही वेळी गुण कमावण्यात तुषारला अपयश आले. या निष्क्रियतेचा दोन्ही वेळा हर्षवर्धनला फायदा झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात एकदा कुस्ती बाहेर नेत आणि नंतर तुषारवर ताबा मिळवत हर्षवर्धनने तुषारवर ५-० असा विजय मिळविला.

हेही वाचा >>>पुणे: बंडातात्या कराडकर उपचारासाठी रुग्णालयात

मॅटवरील दुसऱ्या उपांत्य लढतीत शिवराजने आक्रमक सुरुवात करताना दुहेरी पटाचा डाव टाकत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर सातत्याने कुस्ती बाहेर नेत त्याने तीन वेळा एकेक गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात मात्र पुन्हा एकदा दुहेरी पटाचा डाव टाकून दोन वेळा दोन गुणांची कमाई करत तांत्रिक ११-१ अशा गुणस्थितीत विजय मिळविला.आता उद्या अखेरच्या दिवशी माती विभागात सिकंदर शेख वि. महेंद्र गायकवाड आणि मॅटवर हर्षवर्धन सदगीर वि. शिवराज राक्षे अशा अंतिम लढती होतील. यातील विजेते पुढे महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत खेळतील.