औषध वितरण आणि जैव पदार्थसंबंधित संशोधनाची संधी

पुणे : प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात ‘जैववैद्यकीय तंत्रज्ञान’ या विद्याशाखेत पीएच.डी. संशोधनासाठी पुण्यातील मैथिली जोशीची निवड झाली आहे. मैथिली आता औषध वितरण आणि जैव पदार्थाशी संबंधित संशोधन करणार आहे.

मैथिलीचे शालेय शिक्षण अभिनव प्रशालेत आणि उच्च माध्यमिक शिक्षण फग्र्युसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ के मिकल टेक्नॉलॉजीमधून फार्मास्युटिकल के मिस्ट्री आणि टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.ची पदवी संपादन के ली आहे. मैथिलीचे आई-वडील खासगी शिकवणी वर्ग चालवतात. पदवीपूर्व अभ्यासक्रमातील संशोधन प्रकल्प करताना संशोधन करायला आवडत असल्याची जाणीव तिला झाली. त्यामुळे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापेक्षा पीएच.डी.ला प्राधान्य देण्याचा मैथिलीने निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्वर्डमध्ये पीएच.डी. संशोधनासाठी झालेल्या निवडीबाबत मैथिली म्हणाली, की जैवअभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. करण्याची सुविधा भारतातील विद्यापीठांमध्येही उपलब्ध आहे. पण हार्वर्ड विद्यापीठातील जैवअभियांत्रिकी आणि उपयोजित विज्ञान प्रशाला (बायोइंजिनिअरिंग स्कू ल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस) हा विभाग जगातील पहिल्या क्रमांकाचा मानला जातो.