पुण्यात गतीमंद मुलीवरील बलात्कारप्रकरणी नराधमाला अटक

अल्पवयीन मुलीच्या व्यंगत्वाचा गैरफायदा

arrest
प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील कोथरुडमध्ये गतीमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. साहरुल इसलाम अब्दुल वाहिद लस्कर उर्फ शाहरुख (वय २६) असे अटक केले ल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने १६ वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार केले. पीडित मुलगी गतीमंद होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील पीडित (वय १६) ही आई आणि वडिलांसोबत राहते. पीडितगतीमंद असून तिचे आई-वडिल दोघेही अंध आहेत. ही मुलगी कचरा वेचण्याचे काम करायची. ती आपल्या कामासाठी बाहेर पडल्यानंतर माघावर बसून आरोपी गतीमंद मुलीला शंभर रुपये देऊन तिच्यावर अत्याचार करायचा. मुलीच्या पोटात दुखत असल्याच्या कारणावरुन मुलीला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडितेच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ वाढत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man arrested rape case pune