विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आदित्य गजानन सेवलीकर (वय ३६, रा. पाषाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी आणि सेवलीकर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सेवलीकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार तपास करत आहेत.