scorecardresearch

गुंडगिरीच्या विरोधात मांजरी ग्रामस्थांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा

वाढत्या गुंडगिरीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

गुंडगिरीच्या विरोधात मांजरी ग्रामस्थांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा
गुंडगिरीच्या विरोधात मांजरी ग्रामस्थांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा

पुणे: हडपसर भागातील मांजरी परिसरात गुंडांनी दहशत माजविली आहे. गुंडगिरीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून मांजरीतील ग्रामस्थांनी सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून गुंडांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली.

मांजरी भागात कोयता बाळगणाऱ्या गुंडांनी दहशत माजविली आहे. गुंडांना विरोध करणाऱ्यांना धमकावले जात आहे. पोलिसांकडे तक्रार दिल्यास घरांवर दगडफेक करण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाही. गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वाढत्या गुंडगिरीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा >>> सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने उद्या पुणे बंद; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

हडपसरमधील मांजरी, काळेपडळ, गंगानगर भागात गुंड टोळ्यांनी दहशत माजविली आहे. परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुंड टोळ्यांकडून दहशत माजविली जाते. कोयते उगारुन नागिरकांना धमकावले जाते. महिलांकडील ऐवज हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुंड टोळीतील बहुतांश मुले अल्पवयीन आहेत. हडपसर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई न केल्यास पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 18:42 IST

संबंधित बातम्या