scorecardresearch

Premium

आरक्षणासाठी मराठा सेवा संघ आक्रमक; दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा निर्धार

मराठा समाजाला गृहीत धरून राज्यकर्ते वागतात. निवडून आल्यानंतर समाजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मराठांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे.

Maratha Seva Union
आरक्षणासाठी मराठा सेवा संघ आक्रमक; दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा निर्धार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी : मराठा समाजाला गृहीत धरून राज्यकर्ते वागतात. निवडून आल्यानंतर समाजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मराठांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे. आकुर्डीत झालेल्या मराठा सेवा संघाच्या मेळाव्याला पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, डॉ. मोहन पवार, गोविंद खामकर, शीतल घरत उपस्थित होते.

छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाच्या हितासाठी खंबीरपणे समाजाच्या मागे उभे राहतात, समाजाच्या बाजूने बोलतात. परंतु, मराठा समाजाचे अनेक आमदार, खासदार महत्त्वाची पदे, उमेदवारी मिळविण्यासाठी समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत. मराठा समाजाचे आरक्षण, त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार, खासदारांना धडा शिकवा असे आवाहन रानवडे यांनी केले.

police leave encashment
रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप
sakshi malik bajrang punia slams wfi chief sanjay singh for lifting suspension
बंदी उठवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब; साक्षी, बजरंगचा भारतीय कुस्ती महासंघावर आरोप; नव्याने आंदोलनाचा इशारा
Eknath Shinde Abhishek Ghosalkar
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय
The black paper released by the Congress on Thursday criticized the bjp
१० वर्षांत ४११ आमदारांची फोडाफोडी; काँग्रेसच्या काळय़ापत्रिकेत भाजपवर टीकास्त्र

हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोचा प्रवास आता सवलतीत

हेही वाचा – कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया 2023’चा विजेता

नगरसेवक, आमदार, खासदारांना भेटून मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यास भाग पाडले पाहिजे. महाराष्ट्रातील ठरावीक घराणी सोडली. तर, मराठा समाजाला अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. इतर समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही कोणाला विरोध केला नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळताना कोणीही विरोध करू नये, असे डॉ. पवार म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maratha seva union aggressive for reservation determined to teach a lesson to the neglectful public representatives pune print news ggy 03 ssb

First published on: 06-10-2023 at 10:12 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×