जगभरात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून करोनाचा कहर चालू आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये करोनाचा प्रसार आता झालेला आहे. चीनमधल्या वुहानमध्ये या करोना विषाणूचा उगम झाल्याचं कळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी याविषयीच एक खळबळजनक दावा केला आहे. करोना ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्या वुहानमधल्या प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचं निवेदनही दिलं. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, करोना ज्या लॅबमधून निघाला त्या लॅबचा मालक बिल गेट्स आहे. बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करण्याचं ठरवलं आहे. स्वतः अमेरिकेतल्या दोन लाख ४० हजार एकराचा मालक असून सुद्धा आणि त्यांना आता केंद्रातले कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनालासुद्धा दाद न दिल्यामुळे ७१५ शेतकरी शहीद झाले आहेत. त्या तोमरांनी गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा हे कॉर्पोरेटायझेशन याला जबाबदार आहे.

हेही वाचा – करोनानंतर जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट; बिल गेट्स यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामगारांच्या प्रश्नाविषयी बोलताना पाटकर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, केंद्राची सर्वात महत्वाची भूमिका ही आहे की, केंद्र सरकार महाराष्ट्र,पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांना ८० ते ९० हजार कोटी रुपये देणं देत नाही. पण ज्यावेळी कामगारांसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा केंद्र सरकार राज्यावर जबाबदारी टाकतात, की तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या, त्यामुळे जे काही सध्या चाललं आहे हे संविधान विरोधी आहे. या सर्वासाठी संघर्षांशिवाय गत्यंतरच नाही.