शर्थीच्या प्रयत्नानंतर दोरीने बांधून खाली उतरवले; चिंचवडेनगर भागातील घटना

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

उच्चदाब मनोऱ्यावर रविवारी सकाळी एक युवक चढला आणि त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांची तारांबळ उडाली. जवळपास ४० फूट उंचीवर गेलेला हा युवक काही केल्या खाली उतरत नव्हता. बरेच प्रयत्न करूनही तो दाद देत नव्हता. अखेर, पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, वीजवितरणचे कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने सक्तीने त्याला खाली आणण्यात आले व सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. चिंचवडेनगर येथील साई माउली कॉलनीत पहाटे चार ते सकाळी साडेसात या वेळेत हा प्रकार घडला.

समीर खान (वय २०, रा. चिंचवडेनगर) असे या मनोरुग्ण युवकाचे नाव आहे. त्यास उपचारांसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास हा मनोरुग्ण त्याच्या राहत्या घराशेजारील खांबावर चढला. सकाळी सातच्या सुमारास ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलीस तसेच अग्निशामक दलाला ही माहिती कळवण्यात आली. वीज पुरवठा बंद ठेवून नागरिकांच्या सहकार्याने या मनोरुग्णास खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, तो खाली उतरण्यास तयार नव्हता. जवळ येणाऱ्या प्रत्येकाला तो लाथा-बुक्क्य़ा मारत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यास ताब्यात घेण्यात यश मिळाले. त्याचे हात-पाय दोरीने बांधून त्याला सक्तीने खाली उतरवण्यात आले. त्यानंतर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.