गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र, पुढील चार दिवसांत हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण कमी होत असल्याने राज्यातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने उतरण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : हिंदू जनआक्रोश मोर्चा उद्या ; राजकीय पक्ष हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार

हवामान विभागाकडून यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत कडाक्याची थंडी पडली होती. ही थंडी चार दिवसांनी कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेतील थंडीचा परिणाम जाणवला होता. त्यामुळे हवेत गारवा वाढला होता. सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच उच्च दाबामुळे आणि चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेकडून राज्याकडे येणाऱ्या थंडीला रोध जाणवत आहे. राज्यातील काही भागात दिवसभर ३० अंशांच्या पुढे तापमान असते, तर रात्री अचानक थंडी पडते. याचबरोबर पहाटेच्या वेळी धुके आणि थंडी पडत असल्याने थंडी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.