पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी ९ ते २१ मे या कालावधीत घेण्यात आली. यंदा सहा लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटाच्या तुलनेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटाच्या विद्यार्थ्यांची परीक्षेला अनुपस्थिती अधिक होती. राज्य मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक व बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेध लागले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. सीईटी सेलने नुकतीच सीईटी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली. या उत्तरतालिकेवरील विद्यार्थ्यांच्या हरकती आणि आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १२ जूनला निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलने दिली.

Pune shaharbat Competitive Examination in years A scholar Security audit Pune print news
शहरबात: अभ्यासिकांचा सुळसुळाट… सुरक्षिततेचे काय?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
SSC Students News
SSC : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?
maharashtra scert releases revised curriculum for school education
विश्लेषण : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना काय शिकवले जाणार?
Pharmacy, management courses hit , Pharmacy,
प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्या (कॅप) राबवण्यात येतात. या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करणे, अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे असे टप्पे असतात. त्यानंतर निवड यादी जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेश होतात. त्यानुसार कॅप प्रक्रियेची सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.