BJP MLA Jaykumar Gore Car Accident: रस्ते अपघातात जखमी झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रस्ते अपघातानंतर २४ डिसेंबरला त्यांना पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिक येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

  गोरे यांच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील न्यूरो ट्रॉमा युनिट विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले, एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान ३० फूट खोल होता, त्यामुळे गोरे यांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते. छातीतील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे आठवडाभरापूर्वी त्यांना उपचारांसाठी दाखल केले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अतिदक्षता विभागातील उपचार आणि फिजिओथेरपी यांचा गोरे यांना चांगला उपयोग झाल्याचे डॅा. झिरपे यांनी स्पष्ट केले.

Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
Lok Sabha 2024 BJP announces Narayan Rane for Ratnagiri Sindhudurg seat
रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंना उमेदवारी; ठाण्यात शिंदे गटाचा मार्ग मोकळा?
Candidate of Mahavikas Aghadi in Buldhana Constituency Narendra Khedekars candidature application filed
“ही गद्दार विरुद्ध खुद्दार, अशी लढाई”, सुषमा अंधारे कडाडल्या; नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Nawab Malik was admitted to the hospital due to deterioration of his health
मुंबई : प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात दाखल

हेही वाचा >>>अजित पवारांकडे काही तालुक्यांची सूत्रे द्या, शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी

जयकुमार गोरे म्हणाले, रुबी हॉलमधील संपूर्ण वैद्यकीय उपचार आणि रुग्ण म्हणून मिळालेली आस्थापूर्वक वागणुक यांमुळे बरे होण्याचा प्रवास वेगवान आणि सुकर झाला. जयकुमार गोरे हे पुणे-पंढरपूर महामार्गावर चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना मलठणजवळ पुलावरून चारचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. सातारा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.