लांडगे यांच्या नावाला फडणविसांचीही संमती

पिंपरी : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवडच्या धावत्या दौऱ्यानेही शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. शहराध्यक्षपदावरून निर्माण झालेले संघर्षांचे वातावरण आता निवळले असून आमदार महेश लांडगे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत फडणवीस यांनी यावेळी दिले.

vanchit, Amol Kolhe, court,
अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

चिंचवडला कर्तव्य फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी तरुणाईशी संवाद साधला. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांबरोबर भोजन घेत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्वच प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शहराध्यक्षपदासाठी महेश लांडगे यांच्या नावाला संमती देत त्यांचेच नाव निश्चित होईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शहराध्यक्षपदी लांडगे यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.