पुणे प्रतिनिधी: वडगावशेरी भागातील रस्ते,पाणी यासह अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकार आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार अनेक वेळा केला. पण त्याला कायमची केराची टोपली दाखविण्याच करण्यात आल आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अखेर, लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.

तसेच लाक्षणिक उपोषणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न घेतल्यास अधिक आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्या टीकेला भाजपचे शहराध्यक्ष आणि वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी भूमिका मांडत सुनील टिंगरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार त्यांनी घेतला.

मागील तीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांना मतदारसंघात एक ही नवीन प्रकल्प आणण्यात अपयशी ठरले असून हेच अपयश झाकण्यासाठी आजचं लाक्षणिक उपोषण केलं आहे. तर मतदार संघातील नागरिकांनी निष्क्रिय आमदार म्हणून उपाधी दिली असल्याचं सांगत भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांना चोख प्रत्युत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.