पुण्यात देह व्यापाराप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या एका मॉडेलने सुधारगृहातून पलायन केल्याची घटना घडली आहे. या मॉडेलला पोलिसांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री शहरातील एका हॉटलमध्ये छापा टाकला होता. या हॉटेलमधून पोलिसांनी तामीळ सिनेसृष्टीत काम केलेल्या एका मॉडेलला ताब्यात घेतले होते. देह व्यापाराच्या आरोपाप्रकरणी या मॉडेलला ताब्यात घेण्यात आले होते. या मॉडेलची रवानगी हडपसरमधील  महिला सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र या सुधारगृहातून मॉडेलने पळ काढला असून यात तिच्या दलालाने मदत केल्याचे सांगितले जाते. हा दलाल पाकिस्तानी असून सध्या पोलीस मॉडेल आणि तिच्या दलालाचा शोध घेत आहेत. वादग्रस्त फोटोशूट आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूशी प्रेमसंबंध यामुळे ही मॉडेल चर्चेत आली होती.

मॉडेलच्या पलायनामुळे हडपसरमधील सुधारगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हडपसरच्या सुधारगृहातून यापूर्वीही महिलांनी पळ काढल्याच्या घटना घडल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model run away from rehab centre in pune
First published on: 25-10-2016 at 16:33 IST