व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा गुंड लक्ष्मण उर्फ भैय्या शेंडगे याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

लक्ष्मण उर्फ भैय्या येडबा शेंडगे (वय २३), स्वामी ऊर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (वय २२), आदित्य गणेश मंडलीक (वय २०), अनिल बापु बनसोडे (वय ३०, रा. सर्व, म्हाडा वसाहत, वारजे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी वारजेतील बिअर शॉपीमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने बिअरच्या बाटल्यांची खोकी नेली होती. बिअर शाॅपी चालकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला दमदाटी करुन खंडणी मागितली हाेती.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

हेही वाचा >>>पिंपरीत लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मण उर्फ भैय्या येडबा शेंडगे (वय २३), स्वामी ऊर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (वय २२), आदित्य गणेश मंडलीक (वय २०), अनिल बापु बनसोडे (वय ३०, रा. सर्व, म्हाडा वसाहत, वारजे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी वारजेतील बिअर शॉपीमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने बिअरच्या बाटल्यांची खोकी नेली होती. बिअर शाॅपी चालकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला दमदाटी करुन खंडणी मागितली हाेती.

हेही वाचा >>>पुणे : मोटारचालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला फरफटत नेले

शेंडगे आणि साथीदारांच्या विरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. शेंडगे आणि साथीदारांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर शेंडगे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील १९ गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.