scorecardresearch

Premium

आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ;अवघ्या तीन दिवसात १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण

पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे.

childrens eye infected in alandi
पुण्यातील देवाच्या आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे

पुण्यातील देवाच्या आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १ हजार ६०० पेक्षा अधिक मुलांना याची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी उर्मिला शिंदे यांनी दिली आहे. ज्या शाळांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. अशा शाळांना सुट्टी देण्याचं आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे. वातावरण बदलामुळे डोळ्यांची साथ आल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे. सतत डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यांच्या पापण्या चिटकणे अशी लक्षणे डोळे येण्याची आहेत. डोळ्यांना हात लावल्यास स्वच्छ हात धुणे, डोळे आलेल्या व्यक्तीने किंवा मुलाने चष्मा घालून बाहेर पडावे, डॉक्टरांचा वेळीच योग्य सल्ला घेऊन उपचार करावेत, अशी खबरदारी घेतल्यास डोळ्याची साथ आपण रोखू शकतो असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
five lakh devotees visited the Ram temple
जय श्रीराम! पहिल्या दिवशी पाच लाख भाविक प्रभू रामाच्या चरणी लीन, अयोध्येत रामभक्तांचा मेळा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: More than 1600 children infected in just three days due to eye infection in alandi kjp 91 amy

First published on: 21-07-2023 at 15:29 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×