पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीत २४ हजार ६२३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. १७ हजार ६४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

हेही वाचा >>> पुणे : आता मिळकतकराची आकारणी सदनिकांमधील सुविधांवर आधारित ?

महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १० हजार ९९० जागांपैकी ९३ हजार ९६० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या राबवण्यात आल्या. प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश सोमवारी जाहीर करण्यात आले. विशेष फेरीत १७ हजार ६४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ३ हजार २१० विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, तर १ हजार ५४५ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. पुढील फेरीची प्रवेश प्रक्रिया ९ सप्टेंबरनंतर सुरू करण्यात येईल असे माध्यमिक व उच्च,माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडावा’ योजना केवळ पुणे विभागातच

पहिल्याच दिवशी पाच हजारांवर प्रवेश
अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत पहिल्याच दिवशी ५ हजार ३२६ प्रवेश झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा ५० हजारांचा टप्पा ओलांडला गेला आहे. आरक्षित प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून यादी जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वाधिक प्रवेश खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीत सर्वाधिक प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेऱ्यांमधील प्रवेश
पहिली फेरी – ४२ हजार ७०९
दुसरी फेरी – १७ हजार ६२
तिसरी फेरी – १२ हजार २५३
विशेष फेरी – २४ हजार ६२३