अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक करण्यात आली. लोणी काळभोर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विराेेधी पथकाने त्यांच्याकडून चार लाख १२ हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त केला.

हेही वाचा- पुणे: लोहगड परिसरात शालेय मुलांच्या सहलीची बस दरीत कोसळली; विद्यार्थी किरकोळ जखमी

लोणी काळभोर परिसरातील सोरतापवाडी परिसरात दोन महिला गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. त्या वेळी दोन महिला डोक्यावर पिशवी घेऊन निघाल्या होत्या. पोलिसांना संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील पिशवीची पाहणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. त्यांच्याकडून २० किलो ६५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

हेही वाचा- पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे आभासी चलनाद्वारे आठ कोटी ३० लाखांची खंडणीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.