पुणे:तीन सख्ख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूने संतोषनगर परिसरात शोककळा

सातव नगर रोड येथील संतोषनगर भागात राहणाऱ्या चांदनी, पूनम व मनीषा या परदेशी कुटुंबातील सुना आहेत.

मनीषा ,चांदनी, व पूनम

सातव नगर रोड येथील संतोषनगर भागात राहणाऱ्या चांदनी, पूनम व मनीषा या परदेशी कुटुंबातील सुना आहेत.चांदनी पूनम व मनीषा या तिघी सख्ख्या बहिणी आहेत. हडपसर सातवनगर रोडवरील संतोषनगर भागात पती सासू सासरे कुटुंबीय यासह त्या राहतात. त्यांच्यासोबत बावधन येथील राहणारी बहीणही होती.या चारही बहिणी आहेत.त्या आज सकाळीच हडपसर येथून त्यांच्या माहेरी गेल्या होत्या.माहेरी गेलेल्या असताना धरणक्षेत्रात फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची भावजयही होती.त्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चांदनी रजपूत हिच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा पूनम रजपूत हिच्या पश्चात एक मुलगा मनीषा रजपूत तिच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.
कंजारभाट समाजाची मोठी वस्ती संतोषनगर याठिकाणी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रजपूत परिवारावर कोसळलेल्या संकटामुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भगिनींचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mourning santoshnagar area unfortunate death three sisters hadapsar satwanagar pune print news amy

Next Story
नालेसफाई संथगतीने; कामे ५० टक्के पूर्ण झाल्याचा दावा, पावसाळय़ापूर्वी कामे पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी