पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२० चा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून ४ हजार ९१५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी २ हजार १८४ उमेदवार पुणे जिल्हा केंद्रांवरील आहेत. मुख्य परीक्षा २० नोव्हेंबरला होणार आहे.

एमपीएससीतर्फे  सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२० चा निकाल २४ ऑगस्टला जाहीर करण्यात आला होता. मात्र या निकालावर आक्षेप घेऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागण्यात आली होती. या याचिके संदर्भात न्यायाधिकरणाने २८ सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार एमपीएससीने सुधारित निकाल संके तस्थळावर जाहीर के ला. पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची पात्रता पुढील टप्प्यावर तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून सुधारित निकालाच्या आधारे उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात आले आहे. सुधारित निकालाच्या आधारे नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज आणि परीक्षा शुल्क भरल्यासच त्यांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी एमपीएससीकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. खेळाडू पदासाठी आरक्षित पदासाठी पात्र उमेदवारांच्या क्रीडाविषयक दाव्यांची, कागदपत्रांची वैधता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेसाठी तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयांच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आला आहे. सुधारित निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठीचा वेब दुवा स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट के ले आहे.

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार