वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ साठी ऑप्टिंग आऊट लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. अन्य परीक्षांप्रमाणे वनसेवा परीक्षेलाही ऑप्टिंग आऊट लागू करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. ऑप्टिंग आऊटचा पर्याय निवडण्यासाठी उमेदवारांना १३ एप्रिलपर्यंतची मुदत आहे.

एमपीएससीने वनसेवा मुख्य परीक्षा २०१९साठी ऑप्टिंग आऊट लागू करण्यात आल्याची माहिती प्रसिद्घिपत्रकाद्वारे दिली. या भरती प्रक्रियेत ऑप्टिंग आऊट पर्याय निवडण्याची सुविधा न्यायालय, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीशिवाय अन्य कोणत्याही पद्धतीने ऑप्टिंग आऊटचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.