महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा रविवारी होणार असून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे न मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाची परीक्षा रविवारी (१५ डिसेंबर) घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेची प्रवेशपत्रे मिळाली नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. पुण्यातील ४०-५० विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आयोगाचे संकेतस्थळ सुरू होण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे विद्यार्थी प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेऊ शकलेले नाहीत. प्रवेशपत्रे डाऊनलोड होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.