पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. यामुळे काही काळ द्रुतगती मार्गाचा वेग मंदावला होता. अगदी काही अंतरावरीलदेखील वाहन चालकांना दिसत नव्हतं. त्यामुळे काही वाहन चालक गाड्या रस्त्याच्या कडेला लावून उभे असल्याचंही पहायला मिळत होतं. या दाट धुक्याचा आनंद पुणे-मुंबई द्रुतगतिमीर्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशी आणि वाहनचालकांनी घेतला.
गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवयला मिळत आहे. यामुळे पहाटेच्या सुमारास पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर दाट धुकं पाहायला मिळलं. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात आणि द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर धुकं पसरलेलं होतं. अगदी सूर्य उगवला तरी देखील धुकं पाहायला मिळात होतं. या सर्व परिस्थितीमुळे द्रुतगती मार्गावर गाड्यांचा वेग मंदावला होता.
वाहनचालकांना काही फुटावरील दिसत नव्हते. त्यामुळं चालकांना गाड्या चावताना इंडिकेटर्स लावून वाहनं चालवावी लागत होती. काही वाहन चालकांनी तर द्रुतगतीमार्गालगत गाड्या उभ्या करून धुक्याचा आनंद लुटला. रस्त्यावर जोपर्यंत नीट दिसत नव्हतं तोपर्यंत काही जण प्रवास टाळत चाहाचा आस्वाद घेतानाही दिसत होते.