मूळ रकमेवरील एक महिन्याच व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रीजजवळ ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद शिवाजी आवारे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रकाश शिंदे आणि त्याच्या एका साथीदाराने मिळून ही हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदेंकडून १ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. मात्र शरद आवारे यांनी नोव्हेंबर महिन्याचं व्याज दिले नव्हते. रविवारी रात्री आरोपी प्रकाश शिंदे आणि शरद आवारे हे दोघे नवले ब्रिज येथील सर्व्हिस रोडवर भेटले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यामध्ये आरोपी प्रकाश आणि त्याच्या साथीदाराने शरद आवारेंवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन फरार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरद आवारे यांनी जवळील रूग्णालयात दाखल केले केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.