कात्रजजवळील मांगडेवाडी परिसरात बुधवारी दुपारी युवकाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.तन्मय किशोर इंगळे (वय १७, रा. मांगडेवाडी ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात चौकशीसाठी तीनजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.तन्मय आणि संशयित आरोपी असलेले तरुण परस्परांचे मित्र आहेत. ते बुधवारी दुपारी मांगडेवाडी परिसरात जमले होते. त्यांच्यात पूर्वीच्या भांडणावरून बाचाबाची झाली.

त्यावेळी संशयित आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून शस्त्राचे वार केले. तसेच दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी तन्मयला नजीकच्या रुग्णालयाला तळलेले. मात्र, मोठा रक्तस्त्राव झाल्याने तसेच वर्मी घाव बसल्याने तो जागीच मरण पावला असल्याचे वौद्यकीय तपासणीत आढळले. या प्रकारानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून संशयित युवकांना ताब्यात घेतले.