पुणे : आईवरुन शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा खून करुन पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळी कोंढव्यातील पिसोळी भागात ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

हकिमुद्दीन ताहेरभाई बारोट (वय ६६, रा. पिसोळी, कोंढवा) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी महेश महादेव ओव्हाळ (वय ३२, रा. सिद्धार्थनगर, पिसोळी) याला अटक करण्यात आली. मरियम हकिमुद्दीन बारोट (वय ६५) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर हकिमुद्दीन बारोट यांच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. पोलिसांना खुनामागचे कारणही समजू शकले नव्हते.

हेही वाचा >>> कोंढव्यात ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी महेश ओव्हाळला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हकिमुद्दीन यांनी आईवरुन शिवीगाळ केल्याने त्यांच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरक्षनाथ चिनके, ज्योतिबा पवार, सुजीत मदने, संतोष बनसुडे आदींनी ही कारवाई केली.