scorecardresearch

“बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा”, पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांचं मिश्किल विधान

पिंपरी- चिंचवड च्या भोसरी परिसरात एका खासगी रुग्णालयचे उदघाटन राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाले.

“बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा”, पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांचं मिश्किल विधान
पिंपरी- चिंचवडमध्ये रुग्णालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना

पिंपरी- चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते खासगी रुग्णालयाचे उदघाटन झाले. रुग्णालयाचे चेअरमन हे बेळगावातील आहेत. त्यांचे आणि शरद पवार यांचे चांगले मैत्रीचे संबंध असल्याने शरद पवार हे नेहमी बेळगाव मागत असतात, घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या बेळगाव नको. असे डॉ. प्रभाकर कोरे आपल्या भाषणात म्हणाले, हाच धागा पकडून शरद पवार यांनी मी तुमचे अनेक उदघाटन केली आहेत. मी काही मागत नाही. तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा अशी मिश्किल टिपण्णी पवार यांनी केली. ते पिंपरी- चिंचवडमध्ये रुग्णालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.

हेही वाचा >>> पुणे : “सिकंदर शेखवरून द्वेषाचं…”,महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर अजित पवारांचं वक्तव्य

पिंपरी- चिंचवड च्या भोसरी परिसरात एका खासगी रुग्णालयचे उदघाटन राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाले. रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्या संस्था, वास्तू, रुग्णालयाचे उदघाटन शरद पवार यांचे हस्ते झाले आहे. यावर बोलत असताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, शरद पवार मला नेहमी म्हणतात बेळगाव कधी देणार. साहेब आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, बेळगाव नको. अस आम्ही नेहमी बोलतो. हाच धागा पकडून शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले, काही नवीन केले की ते मला उदघाटनाला बोलवतात. मग कर्नाटकमध्ये असो की महाराष्ट्रात. गेली अनेक वर्षाची ही परंपरा आहे. म्हणून मी नेहमी डॉ. प्रभाकर याना सांगतो, की मी तुमची इतकी उदघाटन केली. मी काही मागत नाही तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका. पण ते नेहमी सांगत असतात की अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगाव ची मागणी करू नका. अशी मिश्किल टिपण्णी शरद पवार यांनी केली. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 21:09 IST

संबंधित बातम्या