वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘मोदी महागाई बाजार’ आयोजित करून अनोख्या पद्धतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले.महागाईची झळ बसलेलल्या विविध छोट्या व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून विविध पदार्थ, भाजी आदिची या आंदोलनात विक्री केली. तसेच वाढत्या महागाईमुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना शहर राष्ट्रवादी काँग्रेसला करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत महागाई विरोधात आंदोलन घ्यावे, अशी मुख्य सूचना शहर पदाधिकाऱ्यांना करण्यात आली होती. त्यानुसार मोदी महागाई बाजार हे अनोखे आंदोलन जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर बुधवारी करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहर प्रवक्ता प्रदीप देशमुख, उदय महाले, वनराज आंदेकर, वैशाली थोपटे, मोनाली गोडसे, अजिंक्य पालकर, सौरभ गुंजाळ यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलशी संबंधित छोटे व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजी विक्रेते, फळविक्रेते, मासे विक्रेते, वडापावची गाडी चालविणारे, फुलविक्रेते, चहाविक्रेते आदींनी त्या-त्या वस्तूंचे प्राततिनिधिक स्टाॅल मोदी महागाई बाजार आंदोलनात लावले. वस्तूंची विक्री करताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सामान्य नागरिकांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.