पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या भाषणात अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण टार्गेट कोणाला करतो.समाजात जे नाण चालत, त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणताही अजेंडा नाही. पवार कुटुंबीयाला टार्गेट केल की, त्याची बातमी होते. आम्हाला जर टार्गेट करून तुम्हाला पब्लिसिटी मिळत असेल तर आम्ही देखील थोडसं दिलदार असलं पाहिजे”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे.

मला नेहमी अरुण जेटली यांची एक गोष्ट आठवते. समाजात ज्यावेळी चुकीच्या गोष्टी होत असतात. तुम्ही दाखवणे बंद करा. हे वागण बंद करतील. त्यामुळे मला अनेक वेळा भाजपाच्या नेत्यांना अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यावी लागते, असं म्हणत सुळेंनी भाजपावर निशाणा साधला

हेही वाचा- अजित पवारांना कुंकवाची अ‍ॅलर्जी, पण निरागस मुलीचा पुरवला हट्ट; चिमुकली औक्षण करण्यासाठी येताच, म्हणाले…

बाळासाहेबांनी स्वतः हयात असताना उत्तराधिकारी निवडला होता

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजच्या दिवशी देखील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे.त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहते.पवार आणि ठाकरे कुटुंबीयांची पाच दशकापासून संबध आहेत.दादा,मी, संपूर्ण पवार, सुळे आणि राष्ट्रवादी कुटुंब या सर्वांच पाच दशकाच प्रेमाच नात आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी देखील जे राजकारण होत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. बाळासाहेबांना न आवडणार होत आहे. बाळासाहेबांनी स्वतः हयात असताना उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी निवडला होता. तो त्यांचा स्वतः चा निर्णय होता. आता शिवसेना फोडण्याचा, तोडण्याचा प्रयत्न करत आहात. यातून एक स्पष्ट होत आहे की, तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाला चॅलेंज देत आहात. यामागे कोणाचातरी स्वार्थ असेल असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा- पुणे : कसब्यातील भाजपचा उमेदवार आज निश्चित? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची बैठक

ही निवडणूक महाविकास आघाडीच जिंकणार

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीबाबत स्थानिक नेते निवडणुक लढविण्यास आग्रही आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा एक राजकीय विषय असून ही निवडणुक महाविकास आघाडीच जिंकणार आहे.ही निवडणूक लढणार आहे.या निवडणुकी बाबत महा विकास आघाडी मधील नेते एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेतील.अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा- ९,८६३ कोटी रुपयांची पीकहानी; गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे सर्वाधिक नुकसान

मी त्याकडे फार लक्ष देत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक कार्यक्रमात भाजप नेत्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचे दिसत आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी त्याकडे फार लक्ष देत नाही. बेरोजगारी, महागाई त्या प्रश्नाकडे लक्ष आहे. तसेच त्यांना जर चालत असेल तर आपण काय करणार, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.