अमली पदार्थ विक्री प्रकरणात नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चतु:शृंगी परिसरात पकडले. त्याच्याकडून दोन लाख ७० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले.

ओकेके इन्फीचिकु जॉन (वय २९, रा. सध्या रा. नवी सांगवी मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख ७० हजारांचे १८ ग्रॅम कोकेन आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात पोलिसांनी उगुचुकू इम्पॅन्युअल (वय ४३, मूळ रा. नायजेरिया, सध्या रा. बाणेर) याला तीन दिवसांपूर्वी पकडले होते.त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. तपासात जॅान अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जॅानला ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मारुती पारधी, मनोज साळुंके, सुजीत वाडेकर, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.