पिंपरी : शहरातील नागरिकांना आपल्या घराजवळच वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील ३५ ठिकाणी ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, दवाखाना उभारण्यासाठी दोनवेळा जाहिरात देऊनही महापालिकेला भाडेतत्वावर जागा मिळत नाही. त्यामुळे दवाखाना उभारण्यासाठी कोणी जागा देता का जागा ? अशी साद घालण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ३५ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे व आपला दवाखाना उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यात येणार आहे. ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत ११ महिन्यांचा भाडेकरार केला जाणार असून, आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाणार आहे. भाडेतत्त्वावर द्यावयाच्या मालमत्ता किंवा मिळकतींचे सर्व कर, पाणीपट्टी, विद्युत देयके करारनामा करण्याच्या तारखेपर्यंत भरलेली असणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागा भाड्याने मिळावी, यासाठी दोनवेळा जाहिरात प्रसिद्ध केली. दोन्ही वेळेस १५-१५ दिवसांची मुदत दिली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. जागामालकाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून देणे, जागेच्या बांधकामाचे आकारमान किमान ७५० ते कमाल एक हजार चौरस फूट व किमान तीन-चार खोल्या असाव्यात, अशा जाचक अटी-शर्तीमुळेच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के

हेही वाचा…पुणे : रिंगरोडबाबत मोठा निर्णय : आचारसंहिता काळात भूसंपादन करायचे की नाही? विभागीय आयुक्तांनी दिला ‘हा’ आदेश

आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ व ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्यासाठी भाड्याने जागा घ्यायची आहे. मात्र, दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही. बाजारभावानुसार जागा भाड्याच्या दरानुसार पैसे संबंधित मिळकतधारकांना दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्यासारख्या महत्त्वाच्या कामाला जागा भाड्याने देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.