मटण, मासळी, चिकन मासळीवर ताव मारुन सामिष खवय्यांनी धुळवड साजरी केली. धुळवडीला मटण, मासळी, चिकनला चांगली मागणी राहिली. मासळी बाजारात खरेदीसाठी झाल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला चिकन, मटण, मासळीला चांगली मागणी असते. मित्र,नातेवाईकांसाठी धुळवडीला सामिष खाद्यपदार्थ तयार केले जातात. मंगळवारी सकाळपासून गणेश पेठेतील मासळी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कसबा पेठ, लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट तसेच विश्रांतवाडी, पौड फाटा, पद्मावती परिसरातील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. धुळवडीला मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा >>> आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील? खासदार बापट- संजय काकडे यांच्याकडून एकत्रित धुळवड साजरी

धुळवडीनिमित्त हाॅटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती. चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळी बाजारात मंगळवारी खोल समुद्र, नदीतील मासळी, खाडीतील मासळी तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची आवक झाली. पापलेट, सुरमई, बांगडी, कोळंबी, बोबिंल या मासळीच्या मागणीत वाढ झाली. मासळीची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. होळीसाठी मच्छीमार किनारी परतले आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मासेमारी कमी होणार असून आवक कमी होईल, असे गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

धुळवडीला मटणाला मागणी होती. हाॅटेल व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांंकडून चांगली मागणी होती, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

मटण- ७०० रुपये

चिकन- २०० ते २३० रुपये

पापलेट- ९०० ते १००० रुपये

बांगडा- १४० ते १६० रुपये

सुरमई- ६०० ते ७०० रुपये

कोळंबी- १८० ते ५५० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non veg food demand on holi festival mutton fish chicken remained in demand on holi eve pune print news rbk 25 zws
First published on: 07-03-2023 at 18:37 IST